सामान्य प्रशासन विभाग हा महत्वाचा विभाग आहे. या विभागामध्ये सहा.प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी तसेच स्थापना-1, स्थापना-2, भांडार कक्ष, सभा, पेंशन विभाग व आवक जावक विभाग इत्यादी मुख्यत्वे काम करीत असतात.
सदर विभागाचे सर्व विभागावरआस्थापणा विषयक नियंत्रण ठेवल्या जाते. साप्रवि अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्यावत करणे, कर्मचाऱ्यांचा रजा मंजूर करणे, वेतन देयके तयार करणे, सेवा निवृत्त कर्मचाऱ्याचे प्रस्ताव व निवृत्तीवेतन, जि.प.ला लागणारी आस्थापणा विषयक माहिती या विभागाकडून सादर करण्यात येते. सेवा निवृत्त कर्मचाऱ्याचे प्रस्ताव व निवृत्तीवेतन वर्ग-३, वर्ग-४ कर्मचा-यांच्या पंचायत समिती अंतर्गत बदल्या त्याचप्रमाणे वाहन, भ.नि.नि., निवृत्ती वेतन, गोपनीय अहवाल, राष्ट्रिय कार्यक्रम इ. कामे या विभागमार्फत पार पाडली जातात.
तसेच गट विकास अधिकारी यांच्या वतीने रचना व कार्यपद्धतीची सर्व विभागांची व पं.स. च्या निरिक्षणाची कामे पार पाडली जातात. या विभागाच्या नोंदणी शाखेमार्फत पंचायत समितीला प्राप्त येणारे सर्व शासन संदर्भ, शासकिय निमशासकीय कार्यालयाकडील संदर्भ, मा.लोकआयुक्त, मा. लोकप्रतिनीधी व सर्वसामान्य नागरीक यांचेकडून प्राप्त होणारे सर्व पत्रव्यवहार आवक-जावक या शाखेकडे स्वीकारली जातात. त्यानंतर पंचायत समिती अंतर्गत संबंधीत विभागाकडे वितरीत केले जातात. या शिवाय मासिक सभेचे आयोजन या विभागामार्फत केले जाते.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.